पाच दशकांचा आंबेडकरवादी मित्र गमावला... - ज. वि. पवार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाच दशकांचा आंबेडकरवादी मित्र गमावला... - ज. वि. पवार

भारिप बहुजन महासंघाची धगधगती मशाल, ढाण्या वाघ, आक्रमक लढाऊ जेष्ठ नेते एल. डी. भोसले यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधनत्यांना विनम्र अभिवादन...!





Social24Network

मी भल्या पहाटे पुणे स्टेशनवर उतरल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील त्या इराणी हाॅटेलमध्ये कोप-यातील टेबलावर माझी प्रतिक्षा करणारा कोपरा एल. डी.च्या निधनाने आज मूका झाल्याचे प्रत्ययास येत आहे. जून 1972 च्या ‘बियांड फ्रेंडशिप’च्या अर्धवार्षिकात माझा दलित पॅंथर वरील लेख चार-पाच पुणेकर मित्रांनी सामूदायिकरित्या वाचला आणि दलित पॅंथरची स्थापना पुण्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे लक्ष्मण भोसले. 


एल. डी. यांनी ‘साधना’ प्रकरण असो, पुणे जिल्ह्यातील आसरवेड, गोनवडी सारखी अत्याचारीत गावे असोत. तेथे जावुन अत्याचारी शक्तीला जरब दाखविण्याचे व खेड्यातील दलितांना अभय देण्याचे काम केले. दलित पॅंथर ते भारिप बहुजन महासंघ हा त्यांचा संघर्ष काळ असो वा विद्यापीठ नामांतराचा लढा असो, एल. डी. अग्रभागी असायचा. त्याला अनेकांनी आमिषे दाखविली परंतु ती या आंबेडकर वारसाने ठोकरली. त्याच्याच पुढाकाराने भय्यासाहेबांचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला. बाळासाहेब आंबेडकर यांची त्याने साथ सोडली नाही. दलित पॅंथरवर त्यानी लिहावे अशी माझी इच्छा होती. त्याने सुरूवातही केली होती. माझ्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला तो पुण्यावरून मुंबईला आला. परंतु मी पुण्यात असुनसुद्धा त्याच्या छोटेखानी पंच्याहत्तरीला हजर राहु शकलो नाही. याची टोचणी लागत आहे. 


लाॅकडाऊन संपल्यानंतर होऊ घातलेल्या मोठ्या कार्यक्रमाला मी ज्येष्ठ म्हणुन हजर रहायचे मान्य केले होते. एल. डी. ने मलाही संधी दिली नाही. पाच दशकातला या सच्च्या आंबेडकरवादी मित्राला माझा अखेरचा जयभीम!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या