The cannibalistic religion of Dharmarakshaks must end - Panther Deepak Kedar
Social24Network
मनूस्मृतीने स्त्रीयांना अत्यंत तुच्छ मानले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनूस्मृती जाळली असली तरी आजही मनूस्मृतीची पिलावळ जिवंत आहे. धर्मरक्षणाच्या नावाने सरकार राजकारण करीत आहे. धर्मरक्षणाच्या नावाखाली दलितांवर, महिलांवर अन्याय-अत्याचाराचे सत्र सातत्याने सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर या धर्मरक्षकांचा नारीभक्षक धर्म संपविला पाहिजे असे आवाहन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी केले आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले की, धर्माच्या नावाने राजकारण करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये सातत्याने दलित, बहुुजन आणि स्त्रीयांना टार्गेट केले जात आहे. अशा धर्मरक्षकांना त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आता आली आहे.
केदार यांनी ट्वीटरच्या माध्यमातुन आवाहन केले आहे की, उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित नाही, पुजा करायला गेलेल्या महिलेवर पुजा-यांनी गॅंगरेप करून तिच्या गुप्तांगात राॅड टाकला आहे. यूपीत महिलांच्या शिकारीचे सत्र सुरूच आहे. बंदायु येथे याआधी दोन सख्या बहिणी झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्या होत्या त्याच बंदायुमध्ये ही घटना घडली आहे. महिलाविरोधी उत्तरप्रदेश सरकारचा जाहिर निषेध !


0 टिप्पण्या