Give the name of Lord Buddha to Aurangabad International Airport; Demand for Panther Sena
औरंगाबाद/प्रतिनिधी:- औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला भगवान गौतम बुद्धांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. यावेळी संघटना प्रमुख सतीश पट्टेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, जगभरात औरंगाबाद ऐतिहासिक शहराची ओळख ही औरंगाबाद बुद्ध लेणी, वेरुळ बुद्ध लेणी, आजिंठा बुद्ध लेणी, पिताळखोरा बुद्ध लेणी या ऐतिहासिक आणि हेरिटेज लेण्या मुळे बुद्ध भूमि म्हणून आहे. जगभरातुन पर्यटक, इतिहास संशोधक, प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ति, संस्था, संघटना हा जागतिक वारसा पाहण्यासाठी येतात. जगभरात भारत देशाची ओळख ही बुद्ध भुमि अशीच आहे. अनेक विकसित बौद्ध देशानी औरंगाबाद शहर, आणि बौद्ध लेण्या विकास आणि संवर्धनासाठी मोठा आर्थिक निधि दिला आहे. अनेक बौद्ध देशानी त्यांच्या देशातील मोठ मोठे उद्योग औरंगाबाद येथे आणले आहेत. भगवान बुद्ध आणि ऐतिहासिक बुद्ध लेण्या या भारत आणि परदेशी राष्ट्र यांच्या व्यापार आणि उद्योग संस्कृतिक सौहार्द आणि संबध यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.
औरंगाबाद शहर हे आशिया खंडातिल झपाट्याने वाढनारे शहर आहे, ऐतिहासिक वारसा आणि वाढते उदयोग क्षेत्र या मुळे जगभरातील देशांशी औरंगाबाद शहर जोडले गेले आहे. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे विस्तारत आहे. बुद्ध भुमि असलेली औरंगाबादची ओळख आणि ऐतिहासिक बुद्ध संस्कृति यामुळे औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला भगवान गौतम बुद्ध यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पॅंथर सेनेने केली आहे. जिल्हाधिका-यांनी आपल्या स्तरावर कार्यवाही करुन संबधित महाराष्ट्र राज्य सरकार, औरंगाबाद महानगर पालिका, भारतीय विमानतळ प्राधिकरण औरंगाबाद, भारत सरकार, केंद्रीय नागरी हवाई उड्डयन मंत्री यांच्या कड़े पाठ पुरावा करावा, गेल्या 20 वर्षा पासुन औरंगाबाद विमानतळाला भगवान गौतम बुद्ध यांचे नाव देण्यात यावे ही मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरिल निवेदन हे नागरी विमान मंत्री हरदीप सिंह पुरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजीत पवार यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे. यावेळी पँथर सेना संघटना प्रमुख सतीश पट्टेकर, रिपब्लिकन युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळ, प्रकाश नवतुरे, संदिप पट्टेकर, प्रकाश पट्टेकर, आकाश ढिलपे आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या