Social24Network
देशाचे प्रधानमंत्री आंदोलनकत्र्यांना आंदोजनजीवी म्हणुन हिनवत आहेत. कारण आंदोलनकत्र्यांजवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, फोटो आहे. होय, आम्ही आंदोलनजीवी आहोत कारण गुलामगिरीतुन मुक्तीचा लढा महामानवांनी आम्हाला आंदोलनातुनच शिकवला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे असा टोला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी लगावला आहे.
अमेरिकेच्या वाॅशिंग्टन पोर्टलने दिलेल्या अहवालानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट हा खोटा असल्याचे उघड झाले असुन डाॅ. आनंद तेलतुंबडे आणि त्यांच्यासह सुडबुद्धीने अटक करण्यात आलेल्या विचारवंतांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अन्यथा राज्यभरात ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे. पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
पुढे बोलतांना केदार म्हणाले की, भीमाकोरेगाव कोरेगाव दंगलीनंतर ज्याला अटक करायचे त्या आतंकवाद्यांना अटक न करता आंबेडकरी घराण्यातले सदस्य डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक केली. वाॅशिंग्टन पोस्ट नावाच्या अमेरिकन पोर्टलने जी माहिती जाहीर केली ती अतिशय भयानक आहे. विचारवंत ज्यांचे लॅपटॉप जप्त केले त्यांच्या मोबाईल मध्ये येथील समाजकंटक आतंकी प्रवृत्तीने डेटा भरला होता. भारतीय समाजमाध्यम येते सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत, मनुवाद्यांचे बटीक झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता चिकित्सकवृत्ती सोडलेली आहे. वाॅशिंग्टन पोस्टने ती चिकित्सकवृत्ती दाखवली आहे. आरएसएसने केलेला खेळ उघड पाडला आहे. आरएसएसच्या पुण्याच्या खासदाराने अर्बन नक्षल या पॅटर्नला विनाकारण जन्म घातला. हे सगळं ठरवून करण्यात आलं आणि यात आंबेडकरी घराण्याच्या सदस्यासहित इतर विचारवंत कार्यकर्त्याना अटक करण्यात आली. त्यांना तुम्ही जेलमध्ये मारणार आहात का? प्रधानमंत्र्याच्या हत्येचा कट खोटा होता हे उघड झाले आहे. तात्काळ डॉ. आनंद तेलतुंबडे यांची सुटका करा अन्यथा राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन छेडेल.
बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा हजारो लोक एकत्र येऊन स्थापन करतात. शरद पवारसह सर्व महाराष्ट्राचे नेते उपस्तीत असतात तेंव्हा कोरोना नसतो का? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्यास कुणीही रोखू शकत नाही, जयंती साजरी होणारच हीच आमची भूमिका आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुले, शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच राज्य आहे या महापुरुषांच्या जयजयकारासाठी पत्रक निघत असेल तर ते आम्ही जाळून टाकू. जयजयकार करतच राहू! ऍड. बाळासाहेब आंबेडकर एकमेव पर्याय आमच्यापुढे उभा आहे. राजकीय क्रांती घडवून आपल्याला आपली ताकद येणाऱ्या काळात दाखवायची आहे. एकजुटीची क्रांती या महाराष्ट्राला दाखवायची आहे. माझी सत्ता आल्यावर मी मोहन भागवतला जेलमध्ये टाकीन म्हणणार एकमेव नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमचं नातं आंबेडकरी घराण्याशी वैचारिक रक्ताचं नातं आहे. माझा कुणीही बाप नाही, मी कुणाचा बांधील नाही एकमेव डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत. कुणाच्या सुपारीच्या तुकड्यावर मी जगत नाही. जेवढा काळ असेल तेवढा फक्त स्वाभिमान हीच ओळख असेल. स्वाभिमान घेऊन लढत राहील.
प्रधानमंत्री आंदोलनजिवी म्हणून आम्हाला आंदोलकांना हिनवतात त्यांची अडचण ही आहे की, आंदोलन करणाऱ्यांच्या हातात बाबासाहेबांचा फोटो असतो. होय, आम्ही आहोत आंदोलनजीवी कारण सामाजिक गुलामगिरीतून मुक्तीचा लढा महामानव डॉ बाबासाहेबांच्या नेत्रत्वात झालेला चवदार तळ्याचा सत्याग्रह हे सुद्धा आंदोलन होतं. दादासाहेब गायकवाडानी केलेला गायरान जमिनीचा सत्याग्रह हे सुद्धा आंदोलन होतं, नामांत्तराच आंदोलन, रिडल्सचं आंदोलन होतं. आंदोलन हीच आमची ओळख आहे म्हणून आम्ही आंदोलनजीवी आहोत. याचा आम्हाला गर्व आहे कारण तो हक्क महामानावाने आम्हाला दिलेला आहे.
महाराष्ट्रात विनाकारण तरुणांवर गुन्हे दाखल करू नयेत अन्यथा महाराष्ट्रात पँथर क्रांती होणार हे कायम लक्षात घ्यावे. ऑल इंडिया पँथर सेना दलितांच्या, संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेली आहे. साथ द्या या ठिकाणी आज तरुणच चळवळीच केंद्र आहे. तरुणांनी व्यसनी होऊ नये व्यसन वाचनाचं केलं पाहिजे, फॅशन पँथर क्रांतिची केली पाहिजे. तरच आपण टिकू अन्यथा व्यसन आणि फॅशन आपल्याला उद्धवस्त करेल. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.


0 टिप्पण्या