Social24Network
प्रतिनिधी पुणे : वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षपदी अनिताताई चव्हाण झाल्याबद्दल (दिनांक ७ फेब्रुवारी रोजी) मायेची सावली महामाता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनाचे औचित्य साधून त्यागमूर्ती रमाई आंबेडकर व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संपूर्ण महीला पदाधिकारी यांचा सत्कार नवनीत अहिरे, अजित पानसरे, सूरज सोनवणे ,संदीप चौधरी, राज ओव्हाळ, राहुल चांदेकर यांनी केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी महा. राज्य सदस्य रोहीणीताई टेकाळे, शहराध्यक्ष अनिताताई चव्हाण, वैशाली गायकवाड, अॅड. अश्विनी नलावडे, प्रतिक्षा रंगारी, मिरा शिरसाठ, सविता चाबुकस्वार, रेखा चौरे, निरंजना गायकवाड, लिना वानखेडे, मिनाक्षी चंदनशिवे, आरती बडेकर, प्रज्ञा चव्हाण, प्रतिमा कांबळे, पुनम चंदलिया, स्विटी कांबळे, रेखा परम आनंद, उषा साळुंखे, आशा शिंदे, सारिका जाधव, सारीका फडतरे,, उषा राजगुरु,सुमित्रा चंदनशिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी यांस प्रबुद्ध भारत दिनदर्शिका २०२१ चे वाटप करून पुढील राजकीय कारकीर्द भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



0 टिप्पण्या