Social24Network
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या फुले-आंबेडकर विद्वत सभेची राज्यभरात पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. या पुर्नबांधणीची जबाबदारी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली आहे. सद्यस्थितीमध्ये फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्याला गती देण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या पुर्नबांधणी समितीमध्ये समन्वयक म्हणुन प्रा. डाॅ. शहाजी चंदनशिवे, उस्मानाबाद, प्रा. डाॅ. मनोज निकाळजे, बुलढाणा आणि प्रा. डाॅ. विनोद उपर्वट, धुळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. 30 जानेवारी 2020 रोजी ही घोषणा एका पत्रकाद्वारे केली आहे.


0 टिप्पण्या