दुसऱ्या मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दुसऱ्या मराठी साहित्य आणि सांस्कृतिक संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची निवड

बीड येथे दुसरे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती मराठी साहित्य वार्ताचे सर्वेसर्वा अमरदीप वानखडे यांनी दिली.


औरंगाबाद/प्रतिनिधी - मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ताचे दुसरे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे साहित्य संमेलन बीड येथे होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. 

डॉ. सरवदे हे चिंतनशील लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्याचे 'जग पाहिले जवळून' हे पुस्तक, 'भूक' आत्मचरित्र आदींसह वैचारिक आणि शैक्षणिक लेखन प्रसिद्ध आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र डॉ. सरवदे यांना आज देण्यात आले. यावेळी मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे, कार्यकारी संपादक प्रकाश इंगळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या