मराठी साहित्य वार्ता आयोजित २ रे मराठी साहित्य संमेलन बीड येथे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी साहित्य वार्ता आयोजित २ रे मराठी साहित्य संमेलन बीड येथे

अध्यक्षपदी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे तर उद्घाटन ज. वि. पवार यांच्या हस्ते होणार





छत्रपती संभाजीनगर - महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था संचलित मराठी साहित्य वार्ता (मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र) च्यावतीने २ रे मराठी साहित्य संमेलन बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह (महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरी) येथे होणार असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक तथा मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे यांनी दिली आहे. 





संमेलनाच्या अध्यध्यक्षपदी डॉ. वाल्मिक सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत ज. वि. पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्षपदी देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप रोडे यांची निवड करण्यात आली आहे.





डॉ. वाल्मिक सरवदे हे चिंतनशिल लेखक म्हणुन प्रसिद्ध असून त्यांचे ‘जग पाहिले जवळून‘ हे पुस्तक, ‘भूक’ आत्मचरित्र आदींसह वैचारिक आणि शैक्षणिक लेखन प्रसिद्ध आहे. संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. प्रकाश इंगळे, सागर धोडपकर, डॉ. अण्णासाहेब सोनवणे, अनिल दिपके, वाल्मिक वाघ, नितीन हजारे, संदीप फंदे, नितीन फंदे,  सुयश नेत्रगावकर, रमा लहाडे, अनुमती तिडके, सीमा कदम, पूजा मेश्राम आदींनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या