निष्ठेचा हिमालय : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निष्ठेचा हिमालय : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांचा लेख. 

सद्यस्थितीत राजकारण हे व्यवसाय झालेले आपण पाहतो आहे. खुर्चीसाठी कोलांटउड्या मारणारे अनेक मातब्बर आहे. घराण्याची पत इभ्रत वाचवण्यासाठी अनेक जण सत्तेला शरण गेले तर सत्तेसाठी विचारांशी द्रोह करणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. परंतु स्वतःच्या जाती धर्माचा विचार न करता, आपला वैचारिक तोल किंचितही ढळू न देता महाराष्ट्राच्या राजसत्तेवर वंचितांना बसविण्यासाठी श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे पाठीशी खंबीरपणे उभे असलेले डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे निष्ठा या शब्दाचा दुसरा समानार्थी शब्दच म्हणावा लागेल..


राजकारणात अनेक वादळे आली परंतु वादळांना परतवून लावत आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पाईक आहोत हे कृतीमधून दाखवून देत आपली निष्ठा आंबेडकरी घरण्याप्रति समर्पित करणारे डॉ. पुंडकर सर आम्हाला निष्ठेचा खरा अर्थ सांगून जातात. सम्यक विद्यार्थी आंदोलन मध्ये मी उगवता कार्यकर्ता असताना पासून ते भारिप बहुजन महासंघ व आज वंचित बहुजन आघाडी या सगळ्या प्रवासात डॉ. पुंडकर सर यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत पाहताना अभिमानाने उर भरून येतो कारण, उभा महाराष्ट्र सत्तेच्या मखमली गालिच्यावर लोटांगन घेत असताना हा मराठा समूहाचा नेता वंचित, उपेक्षित, शोषित, पीडित घटकांना न्याय देण्यासाठी वंचितांची राजकीय चळवळ मजबूत करण्यासाठी तांडा, वाडी, वस्तीवर फिरतो आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शब्द प्रमाण मानून तो शब्द सार्थकी ठरवण्यासाठी जीवाचे रान करणारा नेता म्हणून डॉ. फुंडकर सर आम्हाला राजकारणातील  एकलव्य वाटतात.


2022 मध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे संत्रा परिषद घेऊन यशस्वी करण्याची जबाबदारी सरांवर बाळासाहेबांनी दिली असता फोन वरून अथवा कार्यकर्त्यांच्या हातून काम न करून घेता स्वतः अमरावतीमध्ये मुक्काम ठोकून बारीक बारीक बाबी स्वतः हाताळतांना पुंडकर सर यांना कधीही नाराज होताना मी बघितले नाही. नेत्याच्या शब्दाला निष्ठेची जोड देणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. पुंडकर सर आहेत.


शिक्षण व कृषी क्षेत्राचा पुंडकर सरांना  बराच अभ्यास असल्याने त्याची परिणती राजकारणात होताना दिसते आहे. अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक पद सांभाळताना अनेक वाद- विवाद निर्माण झाले परंतु बाळासाहेबांनी दिलेल्या जबाबदारीला डाग लागणार नाही याची काळजी घेत आंबेडकर नाव प्रामाणिकपणे जपणारा संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून पुंडकर सर आपल्या कृतीतून राजकारणाचे धडे कार्यकर्त्यांना देताना दिसतात. जाती- धर्माच्या पलिकडे जात आपण पक्ष वाढीसाठी माणूस जोडला पाहिजे, त्याच्या व्यथा वेदना समजून घेत मार्ग काढला पाहिजे हा पुंडकर सरांचा संदेश त्यांच्या ठायी असणाऱ्या मानवतेचा परिचय देणारा आहे.


आज घडीला बौद्ध समूहाचे अनेक मंडळी काँग्रेस अथवा इतर पक्षात जुडून असताना डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर जात, धर्म, पंथ, सत्ता, खुर्ची याचा विचार मनाला शिवू न देता कायम ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यात एका संविधानवादी सैनिकाची भूमिका घेतात ही हिमालया एवढी निष्ठा अंगी बाळगणारे डॉ. पुंडकर सर आम्हाला आदर्शवाह नेते वाटतात.


आज 21 मार्च म्हणजे पुंडकर सरांचा वाढदिवस. निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, वंदनिय गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या अमरावती जिल्ह्याचे आपण वंचित चे पालकत्व स्वीकारले. आपल्या मार्गदर्शनातून, नेतृत्वातुन जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी  राजकीय भरारी घेवो ही सदिच्छा व्यक्त करतो. सोबतच ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हिच तथागत चरणी मंगल कामना..!


- सागर भवते

मो. 9850528687

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या