महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था बाळापूर, ड्रीम स्वेअर अकॅडमी, भगत डोळ्यांचे हॉस्पिटल, अकोला, अकोला ब्लड बँक अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार, धम्म संस्कार वर्गाचे प्रवर्तक, बालक संस्कार वर्गाचे निर्माते कालकथित पूज्य भदंत अश्वजीत थेरो यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
बाळापूर/प्रतिनिधी - स्थानिक इंगळे हॉस्पिटल, अॅक्सिडेंट अॅण्ड डे केअर सेंटर, शासकीय ग्रामीण रूग्नालयासमोर, खामगाव रोड येथे सकाळी 10 वाजता शिबीराला सुरूवात होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत धम्मशरण महास्थवीर हे असणार आहेत. उद्घाटन वैभव फरतारे, तहसिलदार, बाळापूर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, मा. आमदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. सैय्यद नातिकोद्दीन खतीब, फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक भास्कर भोजने उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणुन इंगळे हॉस्पिटलचे डॉ. प्रज्योत मुकुंद इंगळे, अकोला ब्लड बॅंकेचे डॉ. के. के. अग्रवाल, बाळापूर न.प.चे नगर अभियंता संवेग गेडाम, वंचितचे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ वानखडे, मा. प्राचार्य आर.एन. वानखडे, ज्येष्ठ पत्रकार रामदास वानखडे, बौद्ध बांधव उत्सव समितीचे अध्यक्ष नाजुकराव उमाळे, रूग्नकल्याण समिती सदस्य डॉ. संतोष धबाले, न.प.चे माजी उपाध्यक्ष राहुल तायडे, माजी सैनिक देवलाल उमाळे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत उमाळे, वंचितचे संजुभाउ उमाळे, नेत्रतज्ज्ञ शत्रुघ्न जाधव, नेत्रतज्ज्ञ पंकज तिडके, वंचितयुवा आघाडी अमरावती जिल्हा महासचिव सागर भवते आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. विश्वजीत वानखडे, प्रा. उमेश जाधव, प्रा. आझाद सर यांनी केले आहे.



0 टिप्पण्या