सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी - सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान  छ. संभाजीनगर (औरंगाबाद) च्या वतीने सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०2५ रोजी सायं. ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,  मराठवाडा साहित्य परिषद, रॉकसी सिनेमा जवळ,  पैठण गेट, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले आहे. 


कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियतदर्शी तेलंग, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते उपस्थित राहणार आहेत. 


प्रमुख उपस्थिती म्हणुन ज्येष्ठ आंबेडकर साहित्यिक डॉ.ऋषिकेष कांबळे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. के.ई. हरिदास, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस.आर. बोदडे, संत कबीर शिक्षण संस्थेचे सचिव धनंजय बोरडे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डी.व्ही. खिल्लारे, भारतीय बौद्ध महासभेचे इंजि. बी.जी. म्हस्के, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत खडसे, ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डॉ. धनराज गोंडाने आदी उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट,  रतनकुमार साळवे, अनंत भवरे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, आनंद चक्रनारायण, अमरदीप वानखडे, मधुकर गवंदे, राजन कीर्तने, डॉ.विनय हातोले, अशोक जोहरे, मधुकर खिल्लारे, सागर धोडपकर, यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या