वंचितच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांच्या स्मरणार्थ अभिवादन सभा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचितच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांच्या स्मरणार्थ अभिवादन सभा

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी नंदनवन कॉलनी छत्रपती संभाजी नगर येथे अभिवादन सभा घेण्यात आली या अभिवादन सभेचे अध्यक्ष ॲड .बाबा सरदार हे होते बाबा सरदार यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा आढावा आपल्या अध्यक्षीय भाषणात केला तर गोपनारायण यांनी सुद्धा बाबा आढाव यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना उजाळा देत आपले विचार व्यक्त केले, या अभिवादन सभेचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कीर्तने यांनी केले. याप्रसंगी सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण, गोकुळ भुजबळ, आनंद मगरे, रोहित शिंदे, अमोल सरदार, अरुण डायलकर, सचिन आंबेवाडीकर, बाळू वाघ आदी सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या