ड्रीम स्वेअर अकॅडमीचा उपक्रम : विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
बाळापूर/प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोला संचलित ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (दि. 6 डिसेंबर 2025 रोजी) सकाळी 6.00 पासून सलग 18 तास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींनी मोठया संख्येने सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाद्वारे आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे, प्रा. उमेश जाधव प्रा. आज़ाद खान सर यांनी केले. या उपक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरीकांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या