युवकांनी संत गाडगेबाबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे : प्रा. विश्वजित वानखडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युवकांनी संत गाडगेबाबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे : प्रा. विश्वजित वानखडे

संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त ड्रीम स्वेअर अकॅडमीकडून अभिवादन

बाळापूर/प्रतिनिधी - (दि. 20 डिसेंबर 2025) : समाजातील अंधश्रद्धा दूर करून शिक्षण व विवेकशीलतेचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश संत गाडगेबाबांनी दिला, युवकांनी संत गाडगेबाबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजित वानखडे यांनी केले.

स्थानिक ड्रीम स्वेअर अभ्यासिका, श्रीराम मंदिर सभागृह, बाळापूर येथे समाजप्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे थोर संत संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शोऐबुद्दीन शेख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आझाद सर उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश जाधव सर यांनी केले. आभार दीक्षा वानखडे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या