ड्रीम स्वेअर अकॅडमीत संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ड्रीम स्वेअर अकॅडमीत संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

बाळापूर (प्रतिनिधी): स्वच्छतेचे अग्रदूत आणि थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती ड्रीम स्वेअर अकॅडमी व ड्रीम स्वेअर अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्रीराम मंदिर सभागृह, बाळापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे होते. 

कार्यक्रमाच्या माध्यमातून गाडगे बाबांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने जोपासावा, असा संदेश देण्यात आला. प्रारंभी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 'शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे' हा बाबांचा विचार आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात किती महत्त्वाचा आहे, यावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप शिरसाठ यांनी मानले. यावेळी प्रतीक बिल्लेवार, मंगेश नितनवरे, भरती दांडगे, रोहिणी राऊत, संजना तायडे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या