१२ वे माई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

१२ वे माई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड

पुण्यात २७ मे रोजी 'रमाई चळवळीचे' १२ वे साहित्य संमेलन

औरंगाबाद (प्रतिनिधी): रमाई फाउंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित १२ व्या रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा आणि ख्यातनाम विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा मुख्य संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी आज (सावित्रीबाई फुले स्मृती दिनी) केली आहे.

प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड ही त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा गौरव मानला जात आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून सक्रिय आहेत. फुले-आंबेडकरी विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

संमेलनाच्या नियोजनासाठी रमाई फाउंडेशन आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. हे संमेलन पुण्यातील साहित्याचा आणि विचारांचा नवा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संमेलनाच्या मुख्य संयोजिका प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी निवडीचे पत्र देऊन परदेशी यांचे अभिनंदन केले. या निवडीबद्दल राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांनी आणि साहित्यिकांनी त्यांचे स्वागत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या