महिला भय मुक्त व हिंसाचार मुक्त आहेत का ? प्रा. अजंलीताई आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महिला भय मुक्त व हिंसाचार मुक्त आहेत का ? प्रा. अजंलीताई आंबेडकर

 अकोला (प्रतिनिधी)-  राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन व गुणवंत शिक्षण संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जेंडर प्रॉब्लेम इन बुध्दीस्ट कम्युनिटी व कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सम्यक सम्बोधी भवन अकोला येथे सकाळी 10 ते सांय. 5 पर्यंत दिनांक 10 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते.

         या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्वे इन्सिटयुट ऑफ सोशल सायन्स च्या मा. प्राध्यापिका तसेच समता नारी मंच पूणे च्या संस्थपक सदस्य प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अरूधंती शिरसाट हया अध्यक्ष स्थानी होत्या  प्रमुख अतिथी म्हणून मा. संध्याताई वाघोडे जि.प.अध्यक्षा , किरणताई बोराखडे नगरसेविका म.न.पा, योगेश जवादे डेप्युटी सी.ओ तथा महिला व बालविकास अधिकारी , विजय शिरसाट सचिव, गुणवंत शिक्षण संस्था अकोला, स्मिता डोंगरे , मिना रंगारी, सुवर्ण ताई जाधव, भाग्यश्री इंगळे हया होत्या.

       यावेळी विद्याताई जोगळेकर व अरूणाताई भट माजी शिक्षीका (गव्ह.गर्लस् हायस्कूल), जि.प.सावित्रीबाई फूले शाळा अकोला यांचा ही आदर्श शिक्षीका म्हणून सत्कार तसेच मा.प्रा. अंजलीताई आंबेडकर हया निवृत्त झाल्यात त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
         आपल्या मार्गदर्शनात मा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, स्त्री पुरूष समानतेकडे पहात असतांना , स्त्रियांना निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याला महत्व असावे,तसेच स्त्रियांचे जिवन भयमुक्त, व हिंसाचार मुक्त असले पाहीजे. महिलांनी जातीअतां साठी पावले उचलावात हे सर्व महिला चांगल्या पद्धतीने करू शकतात  जन्मल्यापासून  मुलगा आणि मुलगी  हा भेदभाव सुरू असतो. सासरी मुलिवर अत्याचार  झाल्यास अजूनही कितीतरी पालक तीच्या पाठीशी ठाम पणे उभे रहात नाही. आणि मग आयूष्यभर रडत रहातात. हे चित्र  बदलवा.
        गुणवंत शिक्षण संस्था अध्यक्ष अरूधती शिरसाठ, जि. प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे, योगेश जवादे बालविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले
        व्दितीय सत्रात मा. अॅड. छाया मेहरे विधी सल्लागार जिल्हा महिला बालकल्याण अकोला. यांनी कामाच्या जागी लैंगिक छळ या कायदया विषयी मार्गदर्शन केले. रूपाली पांडे (संरक्षण अधिकारी जि.म.बा.अकोला) यांनी कौटूबिक हिंसाचाराचा कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. तर वर्षाताई खोब्रागडे (जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ) यांनी जेंडर प्रॉब्लेम इन बुध्दीस्ट कम्युनिटी या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच संजय राजनकर (शहर अभियान व्यवस्थापक म. न. पा.) यांनी स्वंयरोजगारा विषयी मार्गदर्शन केले.
         समारोपास कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गटनेत्या अॅड.धनश्री देव यांनी पीसीपीएनडीटी कायदाचे महत्व पटवून दिले. व महिलांना मार्गदर्शन केले तसेच वंदनाताई वासनिक मा. शिक्षणसभापती मनपा अकोला. यांनी महिलांनी संघटीत राहून प्रत्येक अन्याय अत्याचाराला हिमतीने तोंड दयावे असे सुचविले महिलांनी आजच्या कार्यशाळेत मिळालेली माहिती व कायदयाचे ज्ञान उपयोगात आणावे व इतर महिंलाना मदतीचा हात दयावा असे सुवर्णाताई जाधव यांनी सांगितले या कार्यक्रमाला करूणा महंतारे, अॅड. सीमा भाकरे (जि. म. वा. अकोला) या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होत्या. उदघाटन कार्यक्रमाचे संचलन ज्ञानेश्वरी भटकर यांनी आभार प्रदर्शन सीमा मसराम यांनी केले तर विषयांचे सूत्र संचलनाचे कार्य निखील खंडारे यांनी केले व आभार प्रदर्शन विनोद उन्हाळे यांनी केले.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुणवंत शिक्षण संस्थेचे कुणाल बेलसरे, किशोर भगत, निलेश ठाकरे, महेश पजई, जयश्री तांबडे, सोनु जाधव, जोत्सना गडेकर, वैशाली घनबहादुर, आशिष जंजाळ, रूपाली सिरसाठ, गोपाल फुसे, विनीता पाटील, मिना जंजाळ इ. कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.
महिला भय मुक्त व हिंसाचार मुक्त आहेत का ? प्रा. अजंलीताई आंबेडकर
       अकोला (प्रतिनिधी)-  राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन व गुणवंत शिक्षण संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जेंडर प्रॉब्लेम इन बुध्दीस्ट कम्युनिटी व कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सम्यक सम्बोधी भवन अकोला येथे सकाळी 10 ते सांय. 5 पर्यंत दिनांक 10 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते.
         या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्वे इन्सिटयुट ऑफ सोशल सायन्स च्या मा. प्राध्यापिका तसेच समता नारी मंच पूणे च्या संस्थपक सदस्य प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अरूधंती शिरसाट हया अध्यक्ष स्थानी होत्या  प्रमुख अतिथी म्हणून मा. संध्याताई वाघोडे जि.प.अध्यक्षा, किरणताई बोराखडे नगरसेविका म.न.पा, योगेश जवादे डेप्युटी सी.ओ तथा महिला व बालविकास अधिकारी , विजय शिरसाट सचिव, गुणवंत शिक्षण संस्था अकोला, स्मिता डोंगरे , मिना रंगारी, सुवर्ण ताई जाधव, भाग्यश्री इंगळे हया होत्या.
       यावेळी विद्याताई जोगळेकर व अरूणाताई भट माजी शिक्षीका (गव्ह.गर्लस् हायस्कूल), जि.प.सावित्रीबाई फूले शाळा अकोला यांचा ही आदर्श शिक्षीका म्हणून सत्कार तसेच मा.प्रा. अंजलीताई आंबेडकर हया निवृत्त झाल्यात त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
         आपल्या मार्गदर्शनात मा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, स्त्री पुरूष समानतेकडे पहात असतांना , स्त्रियांना निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्याला महत्व असावे,तसेच स्त्रियांचे जिवन भयमुक्त, व हिंसाचार मुक्त असले पाहीजे. महिलांनी जातीअतां साठी पावले उचलावात हे सर्व महिला चांगल्या पद्धतीने करू शकतात  जन्मल्यापासून  मुलगा आणि मुलगी  हा भेदभाव सुरू असतो. सासरी मुलिवर अत्याचार  झाल्यास अजूनही कितीतरी पालक तीच्या पाठीशी ठाम पणे उभे रहात नाही. आणि मग आयूष्यभर रडत रहातात. हे चित्र  बदलवा.
        गुणवंत शिक्षण संस्था अध्यक्ष अरूधती शिरसाठ, जि. प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे, योगेश जवादे बालविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले
        व्दितीय सत्रात मा. अॅड. छाया मेहरे विधी सल्लागार जिल्हा महिला बालकल्याण अकोला. यांनी कामाच्या जागी लैंगिक छळ या कायदया विषयी मार्गदर्शन केले. रूपाली पांडे (संरक्षण अधिकारी जि.म.बा.अकोला) यांनी कौटूबिक हिंसाचाराचा कायद्याबद्दल मार्गदर्शन केले. तर वर्षाताई खोब्रागडे (जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ) यांनी जेंडर प्रॉब्लेम इन बुध्दीस्ट कम्युनिटी या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच संजय राजनकर (शहर अभियान व्यवस्थापक म. न. पा.) यांनी स्वंयरोजगारा विषयी मार्गदर्शन केले.
         समारोपास कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गटनेत्या अॅड.धनश्री देव यांनी पीसीपीएनडीटी कायदाचे महत्व पटवून दिले. व महिलांना मार्गदर्शन केले तसेच वंदनाताई वासनिक मा. शिक्षणसभापती मनपा अकोला. यांनी महिलांनी संघटीत राहून प्रत्येक अन्याय अत्याचाराला हिमतीने तोंड दयावे असे सुचविले महिलांनी आजच्या कार्यशाळेत मिळालेली माहिती व कायदयाचे ज्ञान उपयोगात आणावे व इतर महिंलाना मदतीचा हात दयावा असे सुवर्णाताई जाधव यांनी सांगितले या कार्यक्रमाला करूणा महंतारे, अॅड. सीमा भाकरे (जि. म. वा. अकोला) या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होत्या. उदघाटन कार्यक्रमाचे संचलन ज्ञानेश्वरी भटकर यांनी आभार प्रदर्शन सीमा मसराम यांनी केले तर विषयांचे सूत्र संचलनाचे कार्य निखील खंडारे यांनी केले व आभार प्रदर्शन विनोद उन्हाळे यांनी केले.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुणवंत शिक्षण संस्थेचे कुणाल बेलसरे, किशोर भगत, निलेश ठाकरे, महेश पजई, जयश्री तांबडे, सोनु जाधव, जोत्सना गडेकर, वैशाली घनबहादुर, आशिष जंजाळ, रूपाली सिरसाठ, गोपाल फुसे, विनीता पाटील, मिना जंजाळ इ. कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या