सम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय विदर्भ दौ-यावर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय विदर्भ दौ-यावर

सम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय विदर्भ दौ-यावर

अकोला ( प्रतिनिधी )- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय हे येत्या २४ सप्टेंबर पासून विदर्भ दौ-यावर असल्याची माहिती सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेशभाऊ किर्तक व अकोला जिल्हाध्यक्ष अमोल स सिरसाट यांनी दिली. सद्या संपुर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बांधणी करीत असून विद्यार्थी चळवळ अधिक जोमाने सुरु राहावी यासाठी आणि 'शिक्षण बचाव मोर्चा' च्या निमित्ताने विदर्भस्तरिय हा दौरा होणार आहे.

आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या तारखा पुढीलप्रमाणे -

दि. २४ सप्टेंबर २०१८ - अकोला
दि. २५ सप्टेंबर २०१८ - बुलढाणा
दि. २६ सप्टेंबर २०१८ - अमरावती
दि. २७ सप्टेंबर २०१८ - वाशीम

असा हा दौरा असणार आहे. जाहीर करण्यात आलेला हा दौरा डिसेंबर मध्ये सम्यकच्या राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी करणारा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या