जावडेकरांच्या 'त्या' विधानाचा सम्यक कडून निषेध

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावडेकरांच्या 'त्या' विधानाचा सम्यक कडून निषेध

अकोला (१५/९/२०१८) - सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोलाच्या वतीने मनुष्यबळ आणि विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या 'त्या' वक्तव्याचा स्थानिक टॉवर चौकात  जाहीर निषेध केला.
जावडेकरांनी काल पुणे येथे शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मागावे काही शाळा सरकारकडे सातत्याने भिकेचा कटोरा घेऊन येतात त्यानी सरकारकडे न येता माजी विध्यार्थ्यांकडे जावे व माजी विध्यार्थीचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या शाळा व महाविद्यालयाना मदत करावे असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानाच्या विरोधात आज सम्यक विध्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने तीव्र निदर्शन करून जाहीर निषेध केला.
यावेळी अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ,संपर्क प्रमुख सचिन शिराळे,राजकुमार दामोदर,हितेश जामनिक,योगेश किर्तक,आकाश गवई,धिरज इंगळे,पवन गवई,रितेश किर्तक,भुषण घनबहाद्दुर,उमेश खंडारे,प्रेमकुमार वानखडे,अक्षय गोपनारायन,पारितोष इंगोले,गोलु शिरसाठ,नयन इंगळे,अक्षय भालेराव,प्रकाश वानखडे,सुमित वाकोडे,शेखर इंगळे,अतुल तायडे आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या