सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन
बुलढाणा (प्रतिनिधी) - सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मुती दिनानिमित्त भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विदयार्थी आंदोलनाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर २०१८ रोजी दु. १२ वाजता शेगाव येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस डॉ. अनिल एस वानखडे हे असणार आहेत तर वक्ते म्हणून आंबेडकरी इतिहासकार प्रा प्रकाश जंजाळ उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते शरद वासतकार, भारीपचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, भारीपचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष प्रा विष्णू उबाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता डोंगरे, लोकसभा संपर्क प्रमुख प्रा सदानंद माळी, सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट, प्रा डॉ राजकुमार दामोदर, नगरसेविका प्रीतिताई शेगोकर, गणेशभाऊ चौकसे, अनिल वाकोडे, नानाराव विरघट, गौतम इंगळे, एड अनिल इखारे, के ले शेंगोकार, अजय साळवे, रोशन इंगळे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या