सम्यकच्या सदस्य नोंदणी अभियानाचे अँड्. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकच्या सदस्य नोंदणी अभियानाचे अँड्. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला (प्रतिनिधी)-   भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा सदस्य नोंदणी कक्षाचे उदघाटन अँड्. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा आयोजित  क्रिकेेट क्लब मैदानावर बाळासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धम्म सभा आज संपन्न होत असून या पार्श्वभूमीवर सम्यकच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम हाती घेतली आहे.

या प्रसंगी मा आ हरिदास भदे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, प्रसन्नजित गवई, ऍड. संतोष रहाटे, सम्यक चे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाठ, महासचिव भाग्यश्री इंगळे, संघटक राजकुमार दामोदर, कोषाध्यक्ष योगेश किर्तक, हितेश जामनिक, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक, महानगर अध्यक्ष पुर्व आकाश गवई, महानगर अध्यक्ष पश्चिम धिरजभाऊ इंगळे,जिल्हा सहसचिव विकेश जगताप,महानगर महासचिव पवन गवई, मुर्तिजापुर तालुकाध्यक्ष किरण डोंगरदिवे,बाळापुर तालुकाध्यक्ष विकास अवचार,अकोट भुषण घनबहाद्दुर,प्रेमकुमार वानखडे ,बन्टी वानखडे यांच्यासह अनेक सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या