आडगावात नेत्ररोगनिदान शिबिर,आणी गुणवंत विध्यार्थी गुणगौरव सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आडगावात नेत्ररोगनिदान शिबिर,आणी गुणवंत विध्यार्थी गुणगौरव सोहळ्यास प्रचंड प्रतिसाद

जालना (प्रतिनिधी) - भोकरदन तालुक्यातील आडगाव येथे कालकथीत नामदेव सांडुजी साळवे यांच्या प्रथम स्म्रुतीदीनानिमित्त लायन्स क्लब औरंगाबाद आणी निळेप्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोगनिदान शिबिर आणी गुणवंत विध्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,प्राचार्य सुनील वाकेकर, अंबादास रगडे , भोकरदन पंचायत समिती सभापती ,विलासशेट आडगावकर , माजी सरपंच उत्तम भोम्बे,संस्थेचे अध्यक्ष , पत्रकार रतनकुमार साळवे ,लायन्स क्लब औरंगाबादचे डॉ.काळे , डॉ.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी कार्यक्रमाला स्थानीक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.तीनशे तें चारशे नागरीकानी या शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यामधे दीपक गजानन शेजूल, प्रतिक प्रकाश घोरपडे , पूजा बळीराम भौंबे , योगीता सुरेश भौम्बे , तेजस्विनी विजय भोम्बे , प्रीती राजू साळवे, हर्षल दादाराव साळवे आदीचा समावेश होता.या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक रतनकुमार साळवे यांनी केले , सूत्रसंचालन प्रा.किरण साळवे, तर आभार प्रदर्शन राहुल गवळी यांनी मानले.हां कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गवळी , प्रतीक साळवे ,सागर  साळवे ,विशाल साळवे , विकी साळवे , राजू साळवे , विनोद साळवे , पंडीत घोरपडे , दीप पवार , भास्कर साळवे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या