आरोग्य शिबिराच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाची महामानवास आदरांजली

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून भारिप बहुजन महासंघाची महामानवास आदरांजली


अकोला (प्रतिनिधी) - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आदरांजली देण्यासाठी भारिप बहुजन महासंघ बाळापूर तालुका, महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघ तसेच कंठक ग्रुप पारस यांच्या यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन पारस  येथील सावित्री बाई फुले चौक (टी पॉईंट) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बळीरामजी शिरस्कार (बाळापूर विधानसभा मतदार संघ) यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा प्रदीपभाऊ वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप बमसं, अकोला), मा प्रसेनजीत गवई (प्रसिद्धी प्रमुख भारिप बमसं, अकोला), मा ज्ञानेश्वर सुलतान (जिल्हा महासचिव भारिप बमसं, अकोला), मा प्रतिभाताई सिरसाट  (अध्यक्षा महिला आघाडी भारिप बमसं, अकोला), मा अमोल सिरसाट  (जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला), मा कविताताई राठोर (ता अध्यक्षा भारिप बमसं बार्शीटाकळी) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
तर प्रमुख पाहुणे म्हणून मा कविताताई खंडारे (सरपंच ग्रा प पारस) मा गजानन लांडे (ता अध्यक्ष भारिप बमसं, बाळापूर), मा मो रफी देशमुख (महासचिव भारिप बमसं, बाळापूर), मा ऍड सुबोध डोंगरे ( ता सचिव भारिप बमसं, बाळापूर), मा मंगेश किसन गवई ( पक्ष प्रवक्ता भारिप बमसं, बाळापूर), मा सुरेंद्र खंडारे (ग्रा पं सदस्य पारस) आदी उपस्थित होते.

हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ योगेश गावंडे (कान, नाक, घास तज्ञ्), डॉ अर्चिन मुरारका (अस्थि रोग तज्ञ्), डॉ निखिल महाजन (नेत्र रोग तज्ञ्) डॉ मनीष श्रीवास्तव (मधुमेह व हृदय रोग तज्ञ्) सर्व राहणार अकोला यांचे योगदान लाभले. या शिबिरात ६० कर्ण बधिरांना स्वरयंत्र, १०० रुग्णांना डोळे तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तसेच विविध रोगांच्या तपासण्या आणि उपचार तज्ञ  डॉक्टररांच्या  देखरेखीखाली करण्यात आल्या. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी रक्तदान सुद्धा केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन मोहोड, नितेश तायडे, निखिल शेलार, आकाश गायकवाड, रोहित वानखडे, मनोज चौधरी, रमण गायकवाड, नरेंद्र इंगळे, रणजित तायडे, सचिन सुरूशे, श्रीकृष्ण भारसाकळे, चंदू दांडगे, इम्रान पठाण, सचिन खंडारे, प्रमोद सोनोने, मंगेश सोनोने, नितीन मोहोड, जगदीश राऊत, धनराज गुलदेवकर, विनीत भारसाकळे, जयसूर्या पातोडे, गजानन गवई, अतुल मेहेंगे, आकाश नाईक, रुपेश बोरकर, शुभम शिरसाट, गुणवंत इंगळे, धनंजय इंगळे, अलीयार खान, अमोल तायडे, अमोल बोरकर, तेजस खरात,प्रशांत मापारी, भारत गायकवाड, अमोल खंडारे, विजय सावळे, ऍड प्रशांत उमाळे, कमलेश सोनोने, मुकेश खंडारे, स्वप्नील चक्रनारायण, सुरज सोनोने, जे एल खंडारे आणि प्रदीप सरकटे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा राजेश वानखडे यांनी केले तर आभार सुरज सोनोने (ता प्रसिद्धी प्रमुख भारिप बमसं, बाळापूर) यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या