अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी कवी तथा साहित्यिक, महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मीडिया सेल प्रदेश प्रमुख अमरदीप वानखडे यांच्या "चरथ भिक्खवे चारिकं" (भन्ते अश्वजीत यांचे लेख) या ग्रंथाचे आज (३१ जानेवारी २०१८) भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या हस्ते शेगाव येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन आयोजित "लोकशाही जागर परिषदेत" करण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय, आंबेडकरी विचारवंत प्रा डॉ राजकुमार सोनेकर, प्रा. डॉ. हमराज उईके, संदीप नंन्देशवर, प्रकाश डाबरसे, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, ऍड अनिल इखारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या