जागा मागण्यासाठी कुवत असावी लागते ; महेश भारतीय यांची राज ठाकरेंवर टीका

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जागा मागण्यासाठी कुवत असावी लागते ; महेश भारतीय यांची राज ठाकरेंवर टीका


टीम सोशल नेटवर्क

काँग्रेसकडे जागा मागण्याला मी काही प्रकाश आंबेडकर नाही अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमातून केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी जागा मागायला कुवतही लागते असा टोला राज ठाकरे यांना लगावला आहे.

या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी एका पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये भारतीय म्हणाले आहेत की, सद्या राज्यभरात वंचित बहुजन आघाडीच्या मोठमोठ्या सभा होत आहेत यामुळे प्रस्थापितांना हादरा बसू लागला आहे. याआधी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्राने वंचित बहुजन आघाडीचा तीन वेळा अग्रलेखातून विरोध केला आहे. आणि आज त्यांचेच बंधू बाळासाहेबांवर भाषणातून टीका करीत आहेत. एकूणच शिवसेना आणि मनसेला आपली दुकानदारी वंचित बहुजन आघाडी बंद करणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली दुकानदारी राखण्यासाठी चालवली जाणारी ही धावपळ आहे. यांनी मराठी मुद्यावरुन मराठी माणसाची केवळ फसवणूक केली आहे. मराठी अस्मिता विसरलेले लोक बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करू पाहत आहेत त्यांना आमचा एकच सांगणे आहे की, जागा मागण्यासाठी कुवत असावी लागते, तुमचा ढोंगीपणा आता जनतेसमोर आला असून तुम्ही कितीही टीका केली तरी या टीकेचा आम्हाला येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या

Prakash ujgare म्हणाले…
हे ढोंगी तर आहेतच ,पण चर्चेत राहण्यासाठी लायकी नसताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करतात.....
कुत्ते तो भोंक्ते ही है...राज ठाकरे ने आपल अस्तित्व जपण्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न...
Nilesh Gaikwad म्हणाले…
वंचित बहुजन आघाडीचाच विजय होईल २०१९.
Unknown म्हणाले…
🇪🇺::साहेब एकच साहेब, आमचे #बाळासाहेब::🇪🇺
Unknown म्हणाले…
हाती चले बाजार कुत्ते भोके हजार...
Unknown म्हणाले…
बाळासाहेब तुम आगे बढो........... हम तुम्हारे साथ है....
Unknown म्हणाले…
Kay coment karav ya tukaran vishay udhya tassa ani he assa
Aakashhiwale म्हणाले…
राज ठाकरे वर टिका करणे बंद करून ११ च्या आंदोलनावर व वंचित बहूजन आघाडीच्या पुढील रणनीतीवर लक्ष केंद्रीत करा.
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहूजन आघाडी