सांस्कृतिक चळवळ बळकट झाली तरच राजकीय क्रांती होऊ शकेल

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांस्कृतिक चळवळ बळकट झाली तरच राजकीय क्रांती होऊ शकेल

 ॲड. संदीप थोरात यांचे प्रतिपादन ; "भय्यासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ आणि आपण" या विषयावर व्याख्यान संपन्न

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - भय्यासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक चळवळीच्या बळकटीकरणाला भर देवून धम्म चळवळ गतिमान केली. महू ते मुंबई अशी भारतभर भीमज्योत काढून आपली प्रतिकं आणि संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यातूनच विहार आणि पुतळ्यांची निर्मिती झाली आणि म्हणूनच तत्कालीन काळात रिपब्लिकन पक्ष हा भारतभर सक्षम होऊ शकला होता. त्यामुळे जो पर्यंत आम्ही आमची सांस्कृतिक प्रतिकं रुजविणार नाही व धम्म चळवळ बळकट करणार नाही, तो पर्यंत आम्ही राजकीय क्रांती घडवून आणू शकणार नाही, असे प्रतिपादन ॲड. संदीप थोरात यांनी केले. ते सुपुत्र सूर्यपुत्र भय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक सत्यशोधक समाज कार्यालयात "भय्यासाहेब आंबेडकरांची धम्मचळवळ आणि आपण" या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमातुन बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजि. महेश निनाळे हे होते.

प्रास्ताविकामध्ये बोलतांना प्रा. भारत सिरसाट म्हणाले की, गेल्या १५ वर्षापासून भैय्यासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रतिष्ठान करीत आहे. १९४४ पासून भैय्यासाहेब हे बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय काम करीत होते. तत्कालीन पुढारी आणि साहित्यिक - विचारवंतांनी भैय्यासाहेबांची दखल घेतली नाही, भैय्यासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवर व्याख्यानातून आणि ग्रंथ प्रकाशित करून प्रतिष्ठानने प्रकाश टाकला आहे. 


सूत्रसंचालन रतनकुमार साळवे यांनी केले तर आभार अमरदिप वानखडे यांनी मानले. यावेळी डॉ. रेखा मेश्राम, अनंत भवरे, राजन कीर्तने, पंडितराव तुपे, डॉ. धनराज गोंडाने, भाऊ पठाडे, मधुकर गवंदे, जितेंद्र भवरे, एल. के. गायकवाड, रामदास अभ्यंकर, मधुकर दिवेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या