छ. संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या वतीने प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन शनिवार, दिनांक दि. १३ डिसेंबर २०२५ सायं. ५.३० वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले आहे.
"भारतीय लोकशाहीसमोरील सद्य:स्थितीतील आव्हाने व उपाय" या विषयावर प्रसिद्ध अभ्यासक, तथा वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे हे या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय मून हे असणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जॅकलीन डोळस, डॉ. क्षमा खोब्रागडे, सिद्धार्थ आल्टे, डॉ. प्रज्ञा साळवे, अनिल खरतडे, डॉ. मधुकर खंडारे, डॉ. प्रकाश सिरसाट, प्रा. भारत सिरसाट, डॉ. किशोर साळवे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. महेंद्र भवरे, डॉ. गंगाधर अहिरे, अमरदीप वानखडे आदींनी केले आहे.


0 टिप्पण्या