तंगळ्यात तंगळ घालण्याचा प्रयत्न करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तंगळ्यात तंगळ घालण्याचा प्रयत्न करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Social24Network

मंदिर उघडण्याच्या मुद्यावरून आज मुख्यमंत्र्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. काय उघडायचं आहे आणि काय नाही ही तुमची जबाबदारी नसून आमची जबाबदारी आहे. तेव्हा आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या आपण सरकारला सहकार्य करावे असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला यांनी आहे.

 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी बोलतांना ते म्हणाले की, हे उघडलं ते उघडलं नाही, याची काळजी काही लोकांना आहे. त्यांना आमचे सांगणे आहे की, ही आमची जबाबदारी आहे. आम्ही फार काळजीपूर्वक आणि संयमाने पुढे जात आहोत. कशाच्याच संदर्भात घाईगरबडीने निर्णय घेता येणार नाही. तेव्हा काही लोकांनी तंगळ्यात तंगळं घालण्याचा प्रयत्न करू नये, अशी नाव न घेता प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या