पुणे: पुण्यातील जहागीर रुग्णालयात काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाले, ते २३ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवणी.सातव २०१४ च्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक आले होते, संसदेत ४ वेळा संसदरत्न म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी होते.संसदेमध्ये अनेक विषयांवर मुद्दे मांडण्याचा त्यांचा विक्रम असून ८१ % हजेरी लावण्याचा त्यांचा विक्रमच म्हणावा लागेल.काँग्रेस नेते
राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा काँग्रेसचे नेतृत्व मोठया जोमाने केले.
0 टिप्पण्या