Social24Network
...so Fadnavis should try to get the loan sanctioned; Prakash Ambedkar slammed the Chief Minister and the Opposition over the politics of the drought situation
परतीच्या पावसाने थैमान घातले असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीवरून सुरू केलेले राजकारण तात्काळ थांबवावे आणि दुष्काळग्रस्तांना मदत करावी अशी कडाडून टीका वंचित बहूजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
The Chief Minister and the Opposition are politicizing the drought situation - Prakash Ambedkar's sharp criticism
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या भेटी घेतल्या परंतु कोणत्याही प्रकारची मदत अद्यापही जाहिर झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखविले आहे तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदत मागायला दम लागतो अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या भेटी घेतल्या असता यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष दुष्काळाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.
...so Fadnavis should try to get the loan sanctioned; Prakash Ambedkar slammed the Chief Minister and the Opposition over the politics of the drought situation
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँड. आंबेडकर म्हणाले आहेत की, महाराष्ट्र शासन हे फक्त केंद्राकडूनच कर्ज काढू शकते. महाराष्ट्र शासनाचे कार्पाेरेशन असेल तर ते इतरत्र कर्ज काढू शकतात परंतु राज्यशासन हे केंद्र शासनाकडूनच कर्ज काढू शकते. इतर कोणाकडून काढू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे कर्जाची मागणी केली आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि जर केला असेल तर देवेंद्र फडणविसांनी केंद्राकडून त्याची मंजूरात आणली पाहिजे ज्याद्वारे शेतक-यांना मदत करता येईल. हा जो काही टोलवाटोलवीचा भाग चालला आहे तो थांबविल्या जावा. ओल्या दुष्काळाच्या संदर्भांत सद्याचे सरकार आणि बीजेपी यांच्यामध्ये जे राजकारण चालले आहे ते त्यांनी थांबवावे. लोक कोरोनामुळे कंटाळलेली आहेत, दुःखी झालेली आहेत. त्यामध्येच आलेल्या ओल्या दुष्काळामुळे लोक उद्ध्वस्त झालेले आहेत. जनता उद्ध्वस्त झाली असतांना होत असलेलं राजकारण तात्काळ थांबवावे, अशी टीका यावेळी अँड. आंबेडकरांनी केली आहे.
If the state offers a loan to the Center, the Fadnavis should try to get it approved; Stop the politics of the drought situation immediately; - Prakash Ambedkar sharply criticizes the Chief Minister and the Opposition


0 टिप्पण्या