अँड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या भाकीताला सुरूवात? ; राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाला सुरूवात

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अँड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या भाकीताला सुरूवात? ; राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाला सुरूवात

Social24Network

येत्या डिसेंबर पर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आज राज्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बार सुरू, हाॅटेल सुरू, देव कुलुप बंद का? तुम्ही हिदुत्ववादी होतात समाजवादी कसे झालात? असा सवाल केला असता मुख्यमंत्र्यांनी मला आपल्या हिंदुत्वाच्या प्रशस्तीपत्राची गरज नसल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामधील संघर्ष समोर आला असून अँड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या भाकीताची ही सुरूवात तर नाही ना? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

यासंदर्भात आज एका वृत्तवाहिनीशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे पत्र लिहिणे योग्य नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या मान मर्यादेला जपत बोलायला पाहिजे. कारण शेवटी राज्यपालांच्या आदेशातुनच राज्य चालत असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण संयमाने हाताळावे. असा सल्ला अँड. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.   

आम्ही पंढरपुरला आंदोलन केलं त्यावेळी कोरोनाला आळा बसला होता. आता कोरोना पुर्णपणे कट्रोलमध्ये आला आहे. लोकांचा भावनांचा विचार व्हावा देवळातून शासनाला आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय चवथ्या अनलाॅक धोरणामध्ये केंद्राने मंदिरं उघडण्याचे आदेश दिले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत या निर्णयावर अंमलबजावणी केली नाही. एकंदरीत राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात चालले आहे. केंद्राने घेतलेल्या भूमिकविरूद्ध राज्याला भूमिका घेता येत नाही. परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारशी ‘बगावत’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केंद्राच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या