मराठी साहित्य वार्ताच्या नासिक जिल्हा प्रतिनिधीपदी सुरेखा बोर्हाडे यांची निवड
नासिक/प्रतिनिधी:- मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र ‘‘मराठी साहित्य वार्ता’’ वेब पोर्टलच्या प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका सुरेखा बोर्हाडे यांची निवड करण्यात आली आहे. आली असल्याची माहिती मराठी साहित्य वार्ताचे समन्वयक राजेंद्र सोमवंशी यांनी दिली आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती पत्र मराठी साहित्य वार्ताचे प्रमुख अमरदीप वानखडे यांनी प्रसिद्ध केले आहे.
सुरेखा बोर्हाडे यांचे ‘बालक-पालक’ आणि ‘लाडकी लेक’ यांचे ही पुस्तके आणि ‘काव्य रेखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून मराठा विद्या प्रसारक समाज, नासिक या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत. यासह सार्वजनिक वाचनालय नासिक, संवाद नाशिक, साहित्यकणा फाऊडेशन, कादवा शिवार आदी सामाजिक, साहित्यिक संस्थेत त्या कार्यरत आहेत. त्याच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात येत असल्याची माहिती यावेळी राजेंद्र सोमवंशी यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या