डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बिरसा मुंडा अध्यासन केंद्र स्थापन करा - डाटा संघटनेची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बिरसा मुंडा अध्यासन केंद्र स्थापन करा - डाटा संघटनेची मागणी

Establish Birsa Munda Study Center at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University - Demand for Data Association

 Social24Network

जननायक, आदिवासी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन (डाटा) चे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर वाघ यांनी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ याप्रकरणी भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी डॉ. वाघ यांनी दिला आहे.

दरम्यान आज जननायक, आदिवासी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन (डाटा) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हिंदी विभागात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर वाघ, कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, उपाध्यक्ष डॉ. भगवान गव्हाडे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विषयाचे गाढे अभ्यासक प्राचार्य बाळासाहेब लिहिणार, डॉ. युवराज धबडगे उपस्थित होते. 

याप्रसंगी बिरसा मुंडा अध्यासन केंद्राची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने करावी हा ठराव घेण्यात असून प्रा. डॉ. किशोर वाघ यांनी बिरसा मुंडा अध्यासन केंद्र विद्यापीठात सुरू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व बिरसा मुंडा अध्यासन केंद्र स्थापन होईपर्यंत आंदोलन, निदर्शने करण्याचा इशारा यावेळी डाॅ. वाघ यांनी दिला आहे.

डॉ. भगवान गव्हाडे म्हणाले की, संपूर्ण आदिवासी प्राध्यापकांच्या न्यायहक्कासाठी, एससी एसटीच्या आरक्षणासाठी लढा बुलंद केला जाईल व सर्व आदिवासी प्राध्यापक शिक्षक एकत्र करून जनजागृती मोहीम राबविली जाईल. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब लिहिणार, युवराज धबडगे, डॉ. धनंजय रायबोले, (प्रदेश सचिव) डॉ. अरुण कोळी (संघटक), डॉ. खिल्लारे डॉ. सूर्यवंशी यांची उपस्थित होते.

Establish Birsa Munda Study Center at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University - Demand for Data Association

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या