Social24Network
महिला आंदोलकांना यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारने धक्का पोहोचविला नाही परंतु मनुवादी विचारसरणीच्या भाजपा/आरएसएस सरकारने महिलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांच्या आडुन ‘‘शेतकरी आंदोलन’’ दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शेतक-यांचे आंदोलन चिरडण्यासाठी केेंद्र शासनाचा नविन पायंडा पाडत आहे. उत्तर प्रदेशातील नगर निगमचा पाण्याचा ट्रॅक्टर महिलांवर चढविण्यात आला. अनेक महिला जखमी झाल्या आहेत. अनेक महिला अत्यावस्थेत आहेत. त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हे शासन हिटलरशाहीचे शासन आहे. आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने महिलांना इजा होईल किंवा त्यांच्यावर अशा प्रकारे ट्रॅक्टर चालविण्याचे धोरण स्वीकारले नाही. या शासनाला कुठल्याही पद्धतीची दया नाही, मया नाही. हे निर्दयी सरकार आहे. अशा पद्धतीच्या वागण्याला दिल्ली आणि लगतच्या प्रदेशातील लोकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी आंदोलनकत्र्यांना संरक्षण देण्यासाठी पुढे यावे. एका बाजुने हिटलरशाही पद्धतीने आंदोलन दडपण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे आम्ही शेतक-यांची चर्चा करणार अशी दुपट्टी भुमिका घेत आहे. या भुमिकांचा आम्ही जाहिर निषेध करतो. असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.


0 टिप्पण्या