डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत सुरू

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत सुरू

 औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीच्या पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू  आहेत. १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि.तीन) पहिल्याच दिवशी १९ हजार ३८४ जणांनी दिली ऑनलाईन परीक्षा दिली.पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च व ६ एप्रिल पासून सुरु करण्यात आल्या. तथापि १५ एप्रिल ते २ मे या दरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले. यानंतर गेल्या आठवडयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक होऊन येथून पुढील सर्व पेपर हे ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी ‘कोविड‘ची सर्व नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे नियम  आहेत


. पदवीचे उर्वरित पेपर ३ मे पासून तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून ऑनलाईन पध्दतीने होईल. संबंधित विद्यार्थ्यानी २८ एप्रिल ते २ मे दरम्यान ‘ऑनलाईन मॉक टेस्ट‘ होत आहे. गेल्या पाच दिवसात ९९ हजार ३१९ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. चारही जिल्ह्यात परीक्षा यशस्वीपणे होत असून एकाही विद्यार्थ्यांची लेखी तक्रार परीक्षा विभागास प्राप्त झालेली नाही. सोमवारी सकाळच्या सत्रात ९ हजार ३८३ तर दुपारी १० हजार १ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या