ज्येष्ठ समाजवादी नेत्या पुष्पाताई मायदेव यांना अभिवादन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ समाजवादी नेत्या पुष्पाताई मायदेव यांना अभिवादन



सूरज सोनवणे

पुणे/प्रतिनिधी: ज्येष्ठ समाजवादी नेत्या तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सासू पुष्पाताई मायदेव यांना वंचित बहुजन आघाडी हडपसर विधानसभा प्रभाग क्रमांक 24 च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 


वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात काल (दि. 21 रोजी) ही अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीवन (तात्या) भडके यांनी पुष्पाताई मायदेव यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 


यावेळी हडपसर विधानसभा अध्यक्ष कृष्णा आदमाने, महासचिव सोमनाथ  लोंढे, उपाध्यक्ष सुधीर शिंदे, विजय धनारिया, मिलिंद सरोदे, हरी वाघमारे, सलीम अन्सारी, अजय साळवे, अमोल बनसोडे, दिलीप क्षेत्रे, संतोष भोईटे, राहुल भोईटे, सिद्धार्थ गायकवाड, बाळासाहेब हजारे, धर्मराज लांडगे, राजेश कजबे, सुनील भडके, मोहित शेख, विजय  कावरे, आकाश भडके, साहिल कसोठे, विकास शेलार, सतिष उबाळे, बापू खांडेकर, भारत फडके,  समाधान शिंदे, राजेंद्र सोनवणे, बंटी निकाळजे, विठ्ठल पगारे, शेख सोहेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या