अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज (दि. 17) ‘कंटूळी’ पुस्तकाचे प्रकाशन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज (दि. 17) ‘कंटूळी’ पुस्तकाचे प्रकाशन

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज (दि. 17) ‘कंटूळी’ पुस्तकाचे प्रकाशन


औरंगाबाद/प्रतिनिधी - रमाई प्रकाशन, औरंगाबाद प्रकाशित आणि प्रा. विष्णू जाधव लिखित ‘कंटूळी’ या  पुस्तकाचे प्रकाशन आज दि. 17 मे 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बहुजन ह्दयसम्राट अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायं. 5 वाजता होणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्रा. प्रल्हाद लुलेकर हे असणार आहेत. पुस्तकावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत प्रा. किसन चव्हाण, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. ह्षिकेश कांबळे, रमाई प्रकाशनचे संचालक प्रा. भारत सिरसाट उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणुन माजी डीवायएसपी रोहिदास जाधव, ज्ञानेश्वर जाधव, संजय मेढे, लालासाहेब जाधव, अ‍ॅड. शिरिष जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. 


तर प्रमुख पाहुणे म्हणुन गिरीष मानव, एस.एल. गायकवाड, रघुनाथ जाधव, पोपट गायकवाड, प्रा. हर्षकुमार गायकवाड, बाबू पवार, धोंडीराम जाधव, अशोक जाधव, विनोद गायकवाड, नारायण गायकवाड, शिवनारायण गायकवाड, राहुल जाधव, विक्की जाधव, रविंद्र गायकवाड, प्रकाश माने, यशवंत फुलारी, देवा गायकवाड, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. प्रकाश इंगळे, प्रभाकरमामा बकले, अमरदीप वानखडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या