प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ पुस्तकाचे 30 जून रोजी प्रकाशन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ पुस्तकाचे 30 जून रोजी प्रकाशन

 प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ पुस्तकाचे 30 जून रोजी प्रकाशन


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - रामजी बोदडे मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था प्रकाशित आणि प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ एस. आर. बोदडे यांचा ऐतिहासिक धम्ममार्च या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. 30 जून 2023 रोजी सायं. 6 वाजता भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत तथा समीक्षक डॉ. संजय मून असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन पू. भ. विशुद्धानंद महास्थवीर, पू. भ. सुगतबोधी महाथेरो, पू. भ. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, पू. भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी, पू. भ. करूणानंद थेरो, पू. भ. धम्मज्योती थेरो, डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, सूचना एवम प्रसारण मंत्रालयाचे माजी उपसंचालक प्रा. विजयकुमार गवई आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामजी बोदडे मानव कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रमाई प्रकाशन तसेच सूर्यपूत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या