स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम नोंदणी करणाऱ्या ७६ स्पर्धकांच या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल, अशी माहिती मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे यांनी "सोशल 24 नेटवर्क" शी बोलताना दिली.


छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठी साहित्य वार्ता (मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र) च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिना निमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन, लघूकथा लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 


स्पर्धेसंबंधित अधिक माहिती

साहित्य पाठविण्याची अंतिम दिनांक - 25 जुलै, 2023

टीप - दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम नोंदणी करणा-या 76 स्पर्धकांचा प्रवेश ग्राह्य धरल्या जाईल.

आजच आपले नाव नोंदवून आपला प्रवेश निश्चित करा. 


नोंदणी शुल्क - 100 रूपये

गुगल पे/फोन पे नंबर - 9595892542


नियमावली

काव्य लेखन स्पर्धा

1. कविता स्वरचित असावी.

2. स्वातंत्र्य दिन हा काव्य लेखन स्पर्धेसाठी विषय असणार आहे. 

3. कविता ही कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 30 ओळींची असावी.

4. आपले साहित्य हे टेस्ट स्वरूपात पाठवावे. (मोबाईलमध्ये टाइप करून) लिखित स्वरूपातील, पीडीएफ स्वरूपातील, फोटो स्वरूपातील साहित्य स्वीकारल्या जाणार नाही. 

5. उत्कृष्ट काव्यरचनेस प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिस देण्यात येईल.

6. कविता कुणाच्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भावना दुखावणारी नसावी.

7. परिक्षकांचा निर्णय अंतीम असेल.


लघूकथा लेखन स्पर्धा

1. लघूकथा ही स्वलिखित असावी. 

2. लघू लेखन स्पर्धेसाठी विषयाला बंधन नसले तरी कथेचा आशय भारतीय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर परिस्थितीशी संबंधीत असावा. 

3. शब्दमर्यादा कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 1500 शब्दांची असावी.

4. आपले साहित्य हे टेस्ट स्वरूपात पाठवावे. (मोबाईलमध्ये टाइप करून) लिखित स्वरूपातील, पीडीएफ स्वरूपातील, फोटो स्वरूपातील साहित्य स्वीकारल्या जाणार नाही. 

5. उत्कृष्ट लघूकथेस प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिस देण्यात येईल.

6. अ-साहित्यिक वा विशिष्ट अभ्यास विषयाशी संबंधित तांत्रिक लेखन स्वीकारल्या जाणार नाही.

7. लघूकथा कुणाच्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भावना दुखावणारी नसावी.

8. परिक्षकांचा निर्णय अंतीम असेल.


दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिक (स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र) असणार आहेत. उत्तेजनार्थ पारितोषिकास फक्त प्रमाणपत्र दिल्या जाईल. सर्व विजेत्या स्पर्धकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित आगामी कार्यक्रमातुन बक्षिस वितरण करण्यात येईल.


whatsapp grup मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/KYoJOAZAWuh29tbqKD2ynv 



अधिक माहितीसाठी भेट द्या.

मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेज

https://www.facebook.com/MARATHISAHITYAWARTA?mibextid=ZbWKwL

मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनल

https://youtube.com/@user-yu7mx6vr5h

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या