मसावाच्या 'राज्यस्तरीय स्पर्धे'चे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठी साहित्य वार्ता (मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र) च्या वतीने "भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिना"निमित्त आयोजित "भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेचा" निकाल आज (दि. 12 ऑगस्ट) मराठी साहित्य वार्ताच्या अधिकृत पोर्टलवरून मसावाचे संपादक अमरदीप वानखडे यांनी जाहीर केला आहे.
दोन्ही स्पर्धांकरीता राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून जाहीर करण्यात आलेला निकाल पुढीलप्रमाणे -
काव्यस्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अजयकुमार वंगे, लातूर (सांग ना दादा भाऊ), द्वितीय पारितोषिक ऋचा रामचंद्र पत्की, लातूर (स्वातंत्र्य दिन), तृतीय पारितोषिक भाग्यश्री राठोड, बदलापूर (सत्यता) तर उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक चव्हाण, नवी मुंबई स्वातंत्र्याचा संग्राम यांनी पटकावले आहे.
कथालेखन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुदाम सोनुले, अमरावती (उजेड), द्वितीय विभागुन प्रा.डॉ. कृष्णा भवारी, सांगली (पंध्रा आगस्ट), प्रणय भुवड, ठाणे (उदर भरण नोहे), तृतीय पारितोषिक गौरी काळे, नाशिक रोड (पारू) तर उत्तेजनार्थ पारितोषिक कांचन गावंडे, अकोला (खरा स्वातंत्र्य दिन) यांनी पटकावले आहे.
पारितोषिक वितरण समारंभाबाबतची सूचना लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या