२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाच्याअध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाच्याअध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड

छत्रपती संभाजीनगर / सावित्रीमाई फुले स्मृतिदिन, जागतिक महिला दिन व प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित २ रे वैदर्भीय आंबेडकर महिला संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

हे संमेलन दि. ८ मार्च २०२६ (जागतिक महिला दिन) रोजी नेर, जि. यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन संस्थापक सदस्य दलित पँथर, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे इतिहासकार व विचारवंत ज.वि. पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

प्रा. डॉ. रेखा मेश्राम या रमाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. रमाई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आयोजित करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्या रमाई मासिकाच्या संपादक आहेत. रमाई मासिक हे केवळ महिलांसाठी चालविले जाणारे मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक महिला लिहित्या करून कवी, लेखक म्हणून पुढे आणल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या