प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

छ. संभाजीनगर/औरंगाबाद - ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांच्या स्मृती दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या विशेष उपस्थितीत "वंचितांचे राजकारण संधी आणि आव्हाने" या विषयावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम (उद्या दि. १४ नोव्हेंबर रोजी) स्थानिक यशवंतराव चव्हाण सभागृह (मसाप) सन्मित्र कॉलनी येथे दुपारी १२:३० वा. आयोजित करण्यात आला आहे.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय मून हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे जिल्ह्यातील उमेदवार अंजन लक्ष्मण साळवे उमेदवार, औरंगाबाद (पश्चिम), अफसर खान यासिन खान उमेदवार, औरंगाबाद (पुर्व), मोहम्मद जावेद मो. इस्हाक कुरैशी उमेदवार, औरंगबाद (मध्य), इंजि. महेश कल्याणराव निनाळे उमेदवार, फुलंब्री उपस्थित राहणार आहेत.



या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने जॅकलिन डोळस, सिद्धार्थ आल्टे, डॉ. प्रज्ञा साळवे, अनिल खरतडे, डॉ. मधुकर खंदारे, प्रा. भारत सिरसाट, डॉ. किशोर साळवे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. महेद्र भवरे, डॉ. गंगाधर अहिरे, अमरदीप वानखडे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या