प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

छ. संभाजीनगर/औरंगाबाद - ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त "दलित आणि ग्रामीण साहित्याचे अनुबंध" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवार, दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक सम्राट अशोका हॉल, पिईएस इंजिनिअरिंग कॉलेज, नागसेनवन, औरंगाबाद येथे सायं. ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय मून हे असणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने जॅकलिन डोळस, सिद्धार्थ आल्टे, डॉ. प्रज्ञा साळवे, अनिल खरतडे, डॉ. मधुकर खंदारे, प्रा. भारत सिरसाट, डॉ. किशोर साळवे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. महेद्र भवरे, डॉ. गंगाधर अहिरे, अमरदीप वानखडे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या