अशोक सरस्वती बौद्ध यांची पत्रकार परिषदेत माहिती
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - बुद्ध विहारांचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन दि. 26 व 27 एप्रिल रोजी एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक अशोक सरस्वती बौद्ध यांनी दि. 06/03/2025 रोजी स्थानिक सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जग प्रसिद्ध बौध्द भिक्खू डॉ.भदंत विनय रक्खिता (बैतूल मध्य प्रदेश) यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध धम्म प्रचारक
धम्मचारी मैत्रेयनाथ ( पुणे ) करतील.
खुले अधिवेशन आंबेडकरी विचारवंत डॉ. एम. ए.वाहुळ यांचे अध्यक्षतेखाली होईल. उद्घाटन, समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे कॉम्रेड धनाजी गुरव (महाराष्ट्र),
प्रदीप चकमा ( त्रिपुरा ), सत्र अध्यक्ष आकाश लामा ( प.बंगाल ), रमेश बँकर ( गुजरात), दीपक कामत ( महाराष्ट्र ), डॉ.रंजना वांडकर, ज्ञानप्रकाश बौध्द आणि विमल मकवाना ( गुजरात), दीपक कामत हे उपस्थित राहातील.
या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणुन दयासागर, बौध्द, डॉ.शशिकांत सिंह, डॉ.ओंकार वानखेडे ( उ.प्र.), मिलिंद बौध्द व अभिमान सोनवणे, बी.के.खातरकर (मध्य प्रदेश), उमेश नागदीवे, महेंद्र बुध्दरत्न, सावित्री नाखले नरेन्द्र ताकसांडे, ए .के.पाटील, जयाजी पाईकराव ,मेहरा गायकवाड ,(महाराष्ट्), व्ही.पी.सिंग व बनवारी लाल (दिल्ली), डॉ. अरूणा लोखंडे, डॉ.प्रतिभा अहिरे आणि जगन शेजवळ, भिक्खू बोधिपालो (संभाजी नगर), भेरुलाल नामा बौध्द, कैलाशचंद खाडीया (राजस्थान ),डॉ.उल्हास आंबेडकर, मिलिंद माटे ( गोवा), देविदयाल फुले, ( हरियाणा ), जी. मोहनन आणि सुब्रम्हणी (तामिळनाडू), परिमल बरुवा ( नागालँड ), राजेंद्र नरहरी ( तेलंगणा ), ओमप्रकाश चौधरी ( छत्तीसगड ), विनोद बौद्ध ( बिहार ) इत्यादी राज्य प्रतिनिधी आपले विचार मांडतील.
भारतीय बौध्द समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय, बुध्द विहार संस्कृती निर्माण करण्यासाठी बुध्द विहारांची भूमिका,आदर्श बुध्द विहार निर्मितीत विहार संचालकांची भूमिका हे तीन चर्चा सत्राचे तीन विषय आहेत. प्रतिनिधी सत्र आणि धम्म देसना सत्र आहे. धम्म प्रचाराचे संगीतमय माध्यम अशोक सरस्वती यांचे आंबेडकरी कीर्तन होईल. निर्माण होत असलेली ऊर्जा भूमी चे अध्यक्ष माजी नगर सेवक चेतन कांबळे आणि प्राचार्य सुनील वाकेकर संयुक्त स्वागताध्यक्ष आहेत. चित्रकार राजानंद सुरडकर यांचे अध्यक्षतेखाली सुकानु समिती असून प्रकाशित होणाऱ्या धम्म निकाय स्मरणिकेचे मुख्य संपादक प्रा.भारत सिरसाठ असून सोबत संपादक मंडळ आहे. सखाराम धानोरकर,किशोर सरोदे, बौद्धाचार्य व्ही.के.वाघ, विजय बचके,महेंद्र खाजेकर,प्रतीक पंचशील, सविता अभ्यंकर, ॲड.ओमप्रकाश सिरसाठ
ऍड.के. ई.हरिदास,उद्धव बनसोडे,विजय बहादुरे, रश्मी रामटेके,आनंद लोखंडे, यांचे अध्यक्षतेखाली शंभर कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या विविध समित्या
तयार करण्यात आल्या आहेत.
डॉ. एम. ए.वाहुळ,चेतन कांबळे ,प्राचार्य सुनील वाकेकर यांचे नेतृत्वात हे आयोजन होत आहे. देशात बुध्द विहारांचा समन्वय करणे,बुध्द विहारात बुध्द विहार संस्कृती निर्माण करणे , संस्कारात एक वाक्यता आणने, विहारात युवकांचा सहभाग कसा होईल, बुध्द गया महाबोधी महाविहार मुक्ती,पालि भाषा आठव्या सूचित आणणे आणि पालि भाषेचा प्रचार करणे हा या अधिवेशनाचा हेतू आहे.देशातील ७०० प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित राहतील.नाशिक, आळंदी यानंतर हे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन आहे.
सर्वांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करावे, अशी संयोजन समितीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या