छत्रपती संभाजीनगर : आज दिनांक ०१/०४/२०२५ रोजी त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठान च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, उपकुलसचिव, जे.डी. कार्यालय, शिक्षण संचालक, पुणे पी.एच विभाग ह्या व सर्वच विभागांना मेलद्वारे निवेदन करण्यात आले की, पीएच डी प्रबंध सादर करण्याकरिता दिलेली ३१/०३/२०२५ ऐवजी आणखी सहा (०६) महिन्याचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा कारण, अनेक संशोधकांना कोरोन काळातील २, ३ वर्षे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, ही बाब सर्वश्रुत आहेच, याव्यतिरिक्त काही तांत्री अडचणी सुद्धा अनेकवेळा संशोधकांना जावे लागत असल्याने व त्यांचे वयक्तिक व शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता वरील दिलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदत वाढवून देण्याची कृपा करावी ही विनंती करण्यात आली. हे निवेदन प्रा. शीलवंत गोपनारायण,अध्यक्ष त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठान यांनी मेलद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या