संघटनेचे मुख्य नेते प्रा. सुनील मगरे यांनी केली नियुक्ती
छत्रपती संभाजी नगर : महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या मुप्टा संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या मुप्टा शिक्षकेतर कर्मचारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी आंबेडकर चळवळीचे नेते अमोल सरदार यांचे नियुक्ती करण्यात आली, मुक्ता संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले यावेळी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संभाजी वाघमारे, प्रा. भास्कर टेकाडे, राजेंद्र जाधव, सुनील पांडे, अमोल मगरे, शेख मुनीर, राहुल चाटसे आधी विविध पदावरील पदाधिकारी व मुप्टा संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीबद्दल मुप्टा संघटनेचे नेते पद्माकर कांबळे, राजू देशमुख, संतोष जयस्वाल, विजय मगरे यांचेसह काँग्रेस नेते डॉ.अरुण शिरसाट, डॉ. शिलवंत गोपनारायण, राजू वानखडे, आनंद चक्रनारायण, दिनेश गजभिये, दिनेश जोशी आदी मित्रमंडळींनी सरदार यांचे अभिनंदन केले आहे.



0 टिप्पण्या