छत्रपती संभाजीनगर, दि 11 (प्रतिनिधी)- चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र भय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन उद्या दि 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.
स्थानिक सत्यशोधक समाज कार्यालय सिडको एन 3 औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे सदरील व्याख्यान आयोजित केले असून सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष एड के ई हरिदास हे अध्यक्षस्थानी लाभणार आहेत. " सूर्यपुत्र भय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांची धम्मचळवळ आणि आपण " या विषयावर ऍड संदीप थोरात यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून भय्यासाहेबांना अभिवादन करणार आहेत.
तरी या सोहळ्यास औरंगाबाद येथील परिवर्तनवादी चळवळीतील तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा भारत शिरसाठ, आनंद चक्रनारायण, रतनकुमार साळवे, अमरदीप वानखडे, अनंत भवरे, राजन कीर्तने, पंडितराव तुपे, डॉ धनराज गोंडाने, मधुकर गवंदे, बाबुराव गवई, सुधाकर निसर्ग यांनी केले आहे


0 टिप्पण्या