"लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शिवकालीन राज्यकारभाराची गरज ; सुरेंद्र धोपटे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

"लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शिवकालीन राज्यकारभाराची गरज ; सुरेंद्र धोपटे

ड्रीम स्वेअर अकॅडमीच्यावतीने छ. शिवाजी महाराज जयंती व संविधान गुण गौरव परीक्षेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

बाळापूर/प्रतिनिधी - आजच्या आधुनिक लोकशाही व्यवस्थेसमोर भ्रष्टाचार, असमानता आणि प्रशासकीय दिरंगाईची मोठी आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी राबवलेली राज्यकारभाराची पद्धत आजही तितकीच सुसंगत आणि मार्गदर्शक असून केवळ सत्ता गाजवणे हा उद्देश न ठेवता 'रयतेचे हित' केंद्रस्थानी ठेवून आखलेली शिवकालीन धोरणे, ही खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्याचा पाया ठरू शकतात, असे प्रतिपादन बाळापूर नगर परिषद उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे यांनी व्यक्त केले. ते (दि. 19/02/2026 रोजी) स्थानिक श्रीराम मंदीर सभागृह स्थित ड्रीम स्वेअर अभ्यासिका, ड्रीम स्वेअर अकॅडमी  येथे आयोजित छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आणि संविधान गुण गौरव परीक्षा - 2025 च्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक भास्कर भोजने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मोहम्मद फय्याज हुसैन, नगरसेवक संजय उमाळे, ॲड. प्रशांत उमाळे उपस्थित होते.

डाॅ. हुसैन बोलतांना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये टिकुन राहण्यासाठी सातत्याने परिश्रम घेणे गरजेचे आहे. शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ड्रीम स्वेअर अकॅडमीने केले आहे, अकॅडमीला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अध्यक्षीय भाषणात भास्कर भोजने म्हणाले की, छ. शिवाजी महाराज हे ऐतिहासिक पराक्रमी रयतेचे राजे होते. त्यांनी जातीच्या पलिकडे जावून राज्यकारभार चालविला आज देशामध्ये जातीच्या नावाने जनतेला भडकविण्याचे काम केले जात आहे, लोकशाही वाचवायची असेल तर संविधानाच्या बाजुने उभे राहावे लागेल. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ड्रीम स्वेअर अकॅडमी व अभ्यासिकेचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे यांनी केले तर आभार प्रा. उमेश जाधव यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधान गुण गौरव परीक्षा - 2025 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी रोशन दामोदर,निखिल उमाळे,प्रेम तायडे,विजय उमाळे,संजना उमाळे, रोहिणी राऊत, प्रतीक्षा उमाळे, प्रज्ञा तायडे, अश्मिरा शेख, पूर्वा पोते आदींसह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या