छ. संभाजीनगर: 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांनी केले. ते रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' या एकपात्री प्रयोगासह 'तरी आम्ही बोलू नये' या वैचारिक काव्यमय कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. दिलीप महालिंगे यांच्या हस्ते झाले
तर अध्यक्षस्थानी ख्यातनाम साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी केले.
प्रा. रमणी बबिता आकाश (पुणे) यांनी 'मी राजगृहातील रमाई बोलतेय' या एकपात्री प्रयोगातून उपस्थितांची मने जिंकली. तसेच 'तरी आम्ही बोलू नये' या वैचारिक काव्यमय कार्यक्रमात प्रा. रमणी बबिता आकाश, श्रेया वाघ, अनिशा दोडके, जित्या जाली, किरण प्रकाश, स्वराज समदूर, विजय लोखंडे, प्रशिक तायडे, किशोर चक्रनारायण, सुमेध वंदना मधुकर, सुभाष गवळी आणि शुभम आव्हाळे यांनी आपापल्या कवितांमधून समाजमनाला जागृत केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजयकुमार गवई ॲड एस आर बोडदे , प्राचार्य सुनिल वाकेकर, प्राचार्य डॉ. यशवंत खडसे, डॉ धनराज गोंडाने, स सो खंडाळकर, रतनकुमार साळवे, ऍड जे के नारायणे व्ही के वाघ, यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैवतीला गवंदे, राजकन्या गोंडाणे, डॉ. वंदना पाटील, शारदा पगारे रत्नकला बनसोडे, संघमित्रा खंडाळकर, सविता अभ्यंकर, सरला सदावर्ते, गंगाबाई सुरडकर, यांनी परिश्रम घेतले.




0 टिप्पण्या