‘सम्यक’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कौस्तुभ शिंदे यांची निवड

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘सम्यक’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कौस्तुभ शिंदे यांची निवड

‘सम्यक’च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी कौस्तुभ शिंदे यांची निवड 
प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांची माहिती 
मुंबई/प्रतिनिधी - सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी कौस्तुभ शिंदे यांची निवड नुकत्याच झालेल्या प्रदेश कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी केली आहे. कौस्तुभ शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासुन विद्यार्थी चळवळीत सक्रिय कार्यरत आहेत. जळगाव जिल्ह्यातील विद्याथ्र्यांचे प्रश्न तडीस लावून विद्यार्थी चळवळ आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन भक्कम पायावर उभी करण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे महेश भारतीय यांनी यावेळी सांगितले. 

जाहिर करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - संघटक - जयश्री तायडे, जिल्हाध्यक्ष - कौस्तुभ शिंदे, उपाध्यक्ष - दीपाली जोहरे, उपाध्यक्ष - योगेश तायडे, महासचिव - विकास बि-हाडे, सचिव - शालिनी खराटे, सचिव - चेतन जाधव, प्रसिद्धी प्रमुख - अक्षय निकम, कोषाध्यक्ष - अभिलाष वाघ, कायदेशीर सल्लागार - अॅड. सहदेव तायडे सदस्य - मयूर साळवे, रत्नदीप मेंढे, रोेहण अवचारे, शुभम अढायगे, प्रशिक सोनवणे, राजेश तायडे आदींचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या